Supreme Court , Shirdi , Sai Sansthan SAAM TV
महाराष्ट्र

Court : 'मविआ' ला 'सर्वाेच्च' चा दणका; शिंदे-फडणवीस सरकारला विचारला प्रश्न

सुप्रिम काेर्टने हायकोर्टच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे अशी माहिती ॲड. सतीश तळेकर यांनी दिली.

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Shirdi : उच्च न्यायालयानं शिर्डी येथील साई संस्थान (sai sansthan) विश्वस्त मंडळ नुकतेच बरखास्त केले हाेते. या निकालाच्या विराेधात मंडळानं सर्वाेच्च न्यायालयात (supreme court) धाव घेतली हाेती. सर्वाेच्च न्यायालयानं देखील विश्वस्त मंडळाला दणका दिला. तसेच देशभरातील मंदिरात वाढत चाललेल्या राजकीय हस्तक्षेपाविषयी चिंता व्यक्त केली आहे.

सन २०१९ कालावधीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताच शिर्डीच्या साई बाबा (sai baba) संस्थानमध्ये विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या विरोधात शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव शेळके यांनी संस्थानच्या घटनेनुसार या नियुक्त्या नसल्याचा आक्षेप घेतला हाेता. तसेच औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी हायकोर्टाने साईबाबा संस्थानवर असलेले राजकीय विश्वस्त मंडळ बरखास्त करा असे आदेश दिले हाेते. तसेच जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीला कामकाज पाहण्याचा आदेश दिला होता. (Shirdi Sai Baba Sansthan News)

या आदेशाच्या विरोधात सुप्रिम कोर्टात गेलेल्या विश्वसातांना सुप्रिम कोर्टानेही दणका दिला आहे. सुप्रिम काेर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे अशी माहिती ॲड. सतीश तळेकर यांनी दिली. याबराेबरच देशभरातील मंदिरात वाढत चाललेल्या राजकीय हस्तक्षेपावर न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

सुप्रिम कोर्टाने नव्याने विश्वस्तांची निवड सरकार कशी करणार आहे याबाबत शिंदे-फडणवीस सरकारला म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. तर देशभरातील मंदिरांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे असेही ॲड. सतीश तळेकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत धरती हादरली; अफगाणिस्तानात 6.2 तीव्रतेचा भूकंप, अनेक भागांत भीतीचे वातावरण

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

Masala Dosa Recipe: सकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल मसाला डोसा; वाचा रेसिपी

Manchurian Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी व्हेज मंच्यूरियन; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT