NCP MERGER NEWS saam tv
महाराष्ट्र

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

NCP Merger Row: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी वेग धरलेला असतानाच आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलीय... तब्बल 1 तास सुनेत्रा पवार आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाली... मात्र ही भेट नेमकी कशासाठी होती? विलिनीकरणाच्या चर्चेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं नेमकी कोणती भूमिका घेतलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे...अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी वर्षा बंगल्यावर तब्बल 1 तास चर्चा केलीय...त्यात दुसरीकडे 13 नोव्हेंबरला दिल्लीत सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यात 35 मिनटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे पडद्यामागे विलिनीकरणासाठी हालचालींना वेग आल्याचं बोललं जातंय. मात्र सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा विलिनीकरणाला विरोध असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिलीय...शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं NDAमध्ये स्वतंत्रपणे सहभागी व्हावं अशी भूमिका माय-लेकानं घेतल्यानं पक्षातील ज्येष्ठ नेते सुनेत्रा पवार आणि दोघांवर नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काही जणं मंत्रिपदासाठी हापापलेले आहेत आणि त्यामुळेच विलिनीकरणासाठी आग्रही असल्याची टीका राऊतांनी केलीय...

'पवारांच्या राष्ट्रवादीत काही जण मंत्रिपदासाठी हपापलेत'

शरद पवारांच्या पक्षात मंत्रीपदासाठी हपापलेले 2-4 लोक असू शकतात. त्यांच्यासाठी शरद पवारांनी त्यांच्या जीवनाचं इतकी वर्ष पाळलेलं सत्त्व नष्ट करावं हे बरं नाही. या खेळात कोण कोणात विलीन होणार हा पुढचा प्रश्न. भाजपच्या पायाशी बुटचाटेगिरी करणाऱ्या गटाशी शरद पवारांनी चर्चा करत बसावं आणि महाराष्ट्रात संभ्रम, संशयाचं वातावरण निर्माण व्हावं हे राज्याच्या परंपरेला शोभणारं नाही.

पवारांवर त्यांच्या पक्षातील आमदार-खासदारांचा विलिनीकरणासाठी दबाब असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलयं... तर काहीजण सत्तेसाठी भुकेलेत, त्यांना आता अन्नपाणी गोड लागत नाही, असा निशाणा वडेट्टीवारांनी साधलाय...

दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा पूर्णविराम दिलाय...एकंदरित शरद पवारांच्या पक्षासोबत विलिनीकरणासाठी दादांच्या राष्ट्रवादीतील एक गट इच्छुक आहे..दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजपही दबाव वाढवत असल्याचं दिसतंय... अशा परिस्थितीत दिल्लीतल्या भेटीगाठी, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठका आणि विरोधकांच्या दाव्यांमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे नाट्य संपणार की आणखी रंगणार याबाबत उत्सुकता ताणली गेलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमध्ये १००० हून अधिक नवजात बालकांचा बालदिन सोहळा

Asia Cup Final : पाकिस्तान चारमुंड्या चित, भारतानं आशिया चषकावर कोरलं नाव, शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय

BJP MLA Video: खांद्यावर kiss केलं नंतर दातात कान पकडला! भाजप आमदाराच्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ

मनसेचा छटपूजेला विरोध, मात्र पक्षाच्याच नगरसेविकेकडून आयोजन|VIDEO

Women Sweat Attraction: महिलांच्या घामाच्या वासामुळे पुरुष आकर्षित होतात? संशोधनातून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT