GST On Education Google
महाराष्ट्र

GST On Education: केंद्र सरकारकडून सुलतानी वसुली? विद्यार्थ्यांच्या फीवरही आता जीएसटी

Tax On Students: राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना आता त्यांच्या विद्यापीठामुळे मोठ्या भुर्दंडाचा सामना करावा लागणार आहे, कारण केंद्राच्या सुलतान वसूलीचे परिणाम त्यांच्या वतीने येणार आहेत.

Bharat Mohalkar

राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना आता मोठ्या भुर्दंडाला सामोरं जावं लागणार आहे. तेही त्यांच्याच विद्यापीठामुळे... केंद्राच्या सुलतानी वसूलीचा फटका विद्यार्थ्यांना कसा बसणार आहे आणि का पाहूयात.

सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणाऱ्या जीएसटीचा नवा घाव आता विद्यार्थ्यांवर पडणार आहे. त्याला कारण ठरलीय केंद्र सरकारने विद्यापीठांना जीएसटी भरण्यासाठी पाठवलेली नोटीस. 2017 पासूनचा तब्बल 16 कोटी 90 लाख रुपयांचा जीएसटी भरण्याची नोटीस केंद्र सरकारने मुंबई विद्यापीठाला पाठवलीय. त्यामुळे सरकारी विद्यापीठांनाही उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला जीएसटी रूपात द्यावा लागणार.

राज्यात 26 विद्यापीठांच्या अंतर्गत 43 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र जीएसटीचा भार विद्यापीठांवर पडला तर विद्यापीठं ही वसुली विद्यार्थ्यांच्या शुल्कातून करण्याची शक्यता आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल?

जीएसटीच्या बोजामुळे शिक्षण शुल्कात वाढ होण्याची शक्यता

जीएसटीमुळे विद्यापीठांचं खर्चाचं नियोजन बिघडणार

विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांमध्ये कपात होण्याची शक्यता

शुल्कवाढीमुळे गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण बंद होण्याचा धोका

जगभरातील देश जीडीपीच्या 5 टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षणावर खर्च करतात. मात्र भारतात अवघा 3 टक्के इतकाच खर्च केला जातो. त्यातही केंद्र सरकारने काढलेला फतवा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे. एकीकडे मंदिरं वाचवण्यासाठी धावाधाव करणारं सरकार शिक्षण मंदिरं उध्वस्त करण्याच्या तयारीत आहे का? एवढंच नाही तर जगभरात शिक्षणावरचा कर माफ असताना केंद्राची ही सुलतानी वसुली गरीबांना शिक्षणाच्या प्रवाहातून दूर लोटण्याचं कारस्थानच नाही का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT