Sujay Vikhe-Patil and Radhakrishna Vikhe-Patil share a light moment during a public meeting in Rahuri. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Sujay Vikhe-Patil Political Lesson: भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटलांनी आपल्या वडीलांना राजकारणाचे धडे दिलेत. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांनीही त्याला कसा प्रतिसाद मिळाला?

Suprim Maskar

राजकारणात भावा-बहिणींमध्ये, पित्रा-पुत्रांमध्ये निवडणुकीचं शीतयुद्ध रंगताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेलच...मात्र भऱसभेत एकमेंकाना राजकारणाचे धडे देण्याचा अनोखा प्रकार विखे पिता- पुत्रानं केलाय... राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर मुलगा अक्षय कर्डिले यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी, यासाठी समर्थकांनी मेळाव्याचे आयोजन केलं होतं.. यावेळी भरसभेत सुजय विखेंनी विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांपासून सावध राहा, असा सल्ला अक्षय कर्डिलेसह वडील राधाकृष्ण विखे पाटलांना दिल्यानं एकच हशा पिकलाय...

दुसरीकडे मुलाने दिलेल्या सल्ल्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. मी सहसा गाडीत कुणाला घेत नाही, मात्र कार्यकर्ते ज्यावेळी गाडीत बसतात त्यावेळी आपले कान पक्के ठेवले पाहिजे, असाच सल्ला राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला...

राजकारणाचे धडे गिरवण्याआधीच विखे पिता-पुत्रानं दिलेला सल्ला अक्षय़ कर्डिले चांगलाच लक्षात ठेवतील... राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विधानसभेची उमेदवारी अक्षय यांना मिळावी, यासाठी समर्थकही आग्रही आहेत... त्यामुळे विखे पिता-पुत्रांचं अक्षय यांना सल्ला देणं म्हणजे राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यासारखंच आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गुरुपौर्णिमेनिमित्ताने गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, वृक्ष संवर्धनाचा संदेश

सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, आता राज्यसभेत 'परीक्षा'

Manoj Jarange : फडणवीसांनी मराठ्यांच्या लेकरांनाच टार्गेट का केलं? जरांगेंचा थेट हल्लाबोल

ICC Ranking : आयसीसी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; वनडेमध्ये शुभमन गिल, टी २० मध्ये वैभव सूर्यवंशीची जबरदस्त झेप

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

SCROLL FOR NEXT