खळबळजनक; पित्याची दोन तरुण मुलींसह आत्महत्या  Saam Tv
महाराष्ट्र

खळबळजनक; पित्याची दोन तरुण मुलींसह आत्महत्या

बेळगावात खळबळजनक एक घटना घडली आहे. फादर्स डे दिवशी चक्क पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावात घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बेळगाव : बेळगावात Belagav खळबळजनक एक घटना घडली आहे. फादर्स डे Father's Day दिवशी चक्क पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी Chikodi तालुक्यातील पोगत्यानट्टी Pogatyanatti गावात घडली आहे. Suicide of father and daughter

फादर्स डे दिवशी पित्याने आपल्या दोन तरुण मुलींसह आत्महत्या Suicide केल्याच्या घटनेमुळे पोगत्यानट्टी गावातील लोक देखील हादरून गेले आहेत. आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव काडप्पा रंगापुरे (वय ४२) असे असून मुलींची नावे कीर्ती (वय २०) व स्फूर्ती (वय १८) अशी नावे आहेत. या तिघांनीही घरात गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा-

काडप्पा यांची पत्नी चन्नव्वा रंगापुरे (वय ४०) यांचे एक आठवड्या अगोदरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. पत्नीच्या निधनाचा धक्का काडप्पा सहन करू शकला नाही. पत्नीच्या मृत्यूनंतर तो पुढे आपल्या कुटुंबाचे कसे होणार याची काळजी त्यांना लागून राहिली होती. Suicide of father and daughter

यामुळे काडप्पा यांनी आपल्या राहत्या घरीच दोन्ही तरुण मुलींसोबतच गळफास घेवून आत्महत्या करून आपले जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्येची घटना मिळताच तातडीने चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. चिकोडी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Matte Makeup vs Dewy Makeup: मॅट मेकअप आणि ड्यूई मेकअप म्हणजे काय? दोन्ही प्रकारात काय फरक असतो?

HSRP Number Plate : तुम्ही कार किंवा बाईकला लावलेली HSRP नंबर प्लेट बोगस तर नाही ना? ही बातमी वाचून 440 व्होल्टचा झटका बसेल!

Maharashtra Live News Update: खासगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण प्रकरण मनसे पदाधिकाऱ्यांना भोवले

धावत्या लोकल ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढली; स्टेशन येताच महिलांनी चोपला|VIDEO

पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि महिला कॉन्स्टेबल नशेत बेधुंद; बेडरूममधील अश्लील व्हिडिओ व्हायरल, कर्मचारी वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT