beed saam tv
महाराष्ट्र

Beed News : ऊसतोडणीच्या वाढीव दरासाठी बीडला आंदाेलन, मजूर कामगार संघटनेचा आक्रमक पवित्रा

आगामी काळात आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा आंदाेलकांनी सरकारला दिला आहे.

विनोद जिरे

Beed News : ऊसतोडणी मजुरीचा दर प्रतिटन 550 रुपये करण्यात यावा. या मागणीसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदाेलनात शेकडाे कामगार सहभागी झाले आहेत. (Maharashtra News)

ऊसतोड मजूर,मुकादम व वाहतूक संघटना यांच्या दरात वाढ करावी या मागणीसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांच्या नेतृत्वाखाली मागण्यांची सरकारकडून पूर्णता होईपर्यंत संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानूसार आंदाेलनास प्रारंभ झाला आहे.

बीड येथे ऊसतोड मजुरांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना आक्रमक झाली आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास ऊसतोड कामगार बेमुदत संपावर जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT