Pandharpur, Sugarcane Prohibited Issue saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : ऊसाची झोनबंदी उठवा, अन्यथा धूराडी पेटू देणार नाही : रयत क्रांती संघटना

Sugarcane Prohibited Issue : साखर कारखानदारांच्या हिताचा निर्णय सरकारने घेतल्याची खंत शेतक-यांनी व्यक्त केली.

भारत नागणे

Rayat Kranti Sanghatana News : राज्यातील ऊस परराज्यात नेण्यास सरकराने घातलेली बंदी झोनबंदी उठवावी या मागणीसाठी आज (साेमवार) रयत क्रांती संघटनेने पंढरपुरात आंदाेलन छेडले आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले म्हणाले यावर्षी राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी उसाच्या उत्पादनात जवळपास 35 ते 40 टक्क्यांनी घट झाल्याने राज्य सरकारने ऊस वाहतूकीवर झोन बंदी लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील ऊस परराज्यात नेण्यास बंदी आली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहे.

या सरकारच्या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा निर्णय साखर कारखानदारांच्या हिताचा तर शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने झोन बंदी तत्काळ उठवावी. अन्यथा एकाही साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष भोसले यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT