Sugar Cane Farmers Protest Saam Digital
महाराष्ट्र

Sugar Cane Farmers Protest: ''मगरीचे अश्रू ढाळत मोर्चे काढता अन्....'' राजू शेट्टींची जयंत पाटलांवर बोचरी टीका

Sugar Cane Farmers Protest: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच नुकसान झालं म्हणत मगरीचे अश्रू ढाळत मोर्चे काढता आणि स्वतःवर ज्यावेळी वेळ येते त्यावेळी मात्र हात आखडता घेता, अशी बोचरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे.

Sandeep Gawade

Sugar Cane Farmers Protest

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच नुकसान झालं म्हणत मगरीचे अश्रू ढाळत मोर्चे काढता आणि स्वतःवर ज्यावेळी वेळ येते त्यावेळी मात्र हात आखडता घेता, अशी बोचरी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयंत पाटील यांच्यावर केली आहे. ऊस दरासंदर्भात बैठक फिस्कटल्यानंतर ते सांगलीतील इस्लामपूर येथे राजारामबापू साखर कारखाना येथे आंदोलन ठिकाणी बोलत होते.

दुपारपासून जयंत पाटलांच्या राजारामबापू साखर कारखान्याचे गाळप ठप्प झाले आहे. कारण ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात राजारामबापू साखर कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. कारखानाच्या वजन काट्यासमोर ठिय्या आंदोलनामुळे उसाची वाहने थांबून आहेत. तर आंदोलकांनी या ठिकाणी जेवणाची सोय आणि मंडप ही घालण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जसा उसाचा फॉर्म्युला दिला आहे. तसाच सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी द्यावा या मागणीसाठी सकाळ पासून आंदोलन करण्यात येत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारखाना प्रशासनासोबत स्वाभिमानीची बैठक फिस्कटली

राजारामबापू साखर कारखाना प्रशासनासोबत स्वाभिमानीची बैठक फिस्कटली.राजारामबापू साखर कारखान्याकडून 3100 रुपये पहिली उचल आणि गत हंगामातील 50 रुपये देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र रिकव्हरी दराप्रमाणे पहिली उचल 3200 रुपये देण्याच्या मागणीवर राजू शेट्टी अडून बसले आहेत. आम्ही कारखानादारी विरोधात नाही मात्र दरासाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Fat Yoga: हनुवटी आणि गळ्यावरची चरबी ७ दिवसात करा कमी रोज फक्त १० मिनिट करा 'हा' फेस योगा

Heart Attack Women: सावधान! हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभरआधी महिलांमध्ये दिसतात ही सामान्य लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरेल घातक

Maharashtra News Live Update: अशोक खरातला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Crime: सोबत बसून दारू प्यायले, नंतर नवऱ्याने बायकोला संपवलं; शिर धडावेगळं करून गावभर फिरवलं, थरकाप उडवणारा VIDEO

Accident News : आंबेनळी घाटात भीषण अपघात, ९०० फूट खोल दरीत पडून नवरा-बायकोचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT