महापौर वाहन व्हीआयपी नंबर प्रकरण : मुनगंटीवारांनी आयुक्तांवर ढकलली जबाबदारी Saam Tv
महाराष्ट्र

महापौर वाहन व्हीआयपी नंबर प्रकरण : मुनगंटीवारांनी आयुक्तांवर ढकलली जबाबदारी

चंद्रपूर महापालिकेने महापौरांसाठी घेतलेल्या नव्या कोऱ्या कार आणि व्हीआयपी नंबरसाठी केलेल्या उधळपट्टीला आयुक्त जबाबदार आहेत, अशी भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली.

संजय तुमराम

संजय तुमराम

चंद्रपूर : चंद्रपूर महापालिकेने महापौरांसाठी घेतलेल्या नव्या कोऱ्या कार आणि व्हीआयपी नंबरसाठी केलेल्या उधळपट्टीला आयुक्त जबाबदार आहेत, अशी भूमिका भाजप BJP नेते सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी घेतली. 11 लाखांच्या वाहनांसाठी अतिरिक्त 70 हजार रुपये खर्च करून व्हीआयपी नंबर घेण्यात आला. चंद्रपूर महापालिकेच्या या उधळपट्टीवर नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत.

विशेष म्हणजे चंद्रपूर महापालिकेवर भाजपची सत्ता असून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार सत्तापसक्षाचे मार्गदर्शक आहेत. मनपा अथवा नगरपालिकेत सर्व आर्थिक अधिकार प्रशासनाकडे असल्याची आठवण मुनगंटीवार यांनी करून दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका जनहितार्थ सूचना देण्याची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अतिविशिष्ट क्रमांकासाठी पैसे मोजले असतील तर ती बाब प्रशासनाच्या कार्यकक्षेतील असून, चौकशी करून चंद्रपूर मनपाच्या आयुक्तांकडून हे पैसे वसूल केले जावे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हे देखील पहा-

दरम्यान, आरोग्य सेवा Health Service बळकट करण्यासाठी महापालिकेकडे Municipal Corporation पैसे नव्हते. पण अशाही स्थितीत महापौरांसाठी नवी कोरी कार घेतली गेली. महापालिकेचे "कार"नामे इथंच थांबत नाहीत, तर या वाहनाच्या अतिविशिष्ट (व्हीआयपी) क्रमांकासाठी "७०" हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली होती.

तसेच त्यासाठी अतिविशिष्ट ‘एमएच ३४ बीव्ही ११११’ MH 34 BV 1111 हा क्रमांक मिळावा यासाठी राज्य परिवहन विभागाकडे ७० हजार रुपये शुल्क भरण्यात आले होते. विशेष म्हणजे, शासकीय वाहनासाठी अतिविशिष्ट क्रमांक मिळावा म्हणून अशाप्रकारे शासकीय निधी Government funding खर्च करणे अयोग्य आहे. तेव्हा आयुक्तांवर उधळपट्टीचा ठपका ठेवून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा आरटीआय कार्यकर्ते राजेश बेले यांनी केली होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT