BJP MLA Sudhir Mungantiwar arrives at Ramnagar Police Station to file complaint against Pollution Control Board officer amid farmers’ protest over crop loss in Chandrapur. Saam Tv
महाराष्ट्र

भाजपचे दिग्गज नेते पोहोचले पोलीस ठाण्यात; बड्या अधिकाऱ्याविरोधात केली तक्रार दाखल

Sudhir Mungantiwar Complaint Against Pollution Officer Chandrapur: चंद्रपूरमधील कोल वॉशरी प्रदूषणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नुकसानभरपाईच्या मागणीने प्रकरण तापण्याची शक्यता.

Omkar Sonawane

भाजपचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्वतः पोलिस ठाण्यात जात प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. ही तक्रार चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून यावेळी पीडित शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बेलसनी येथील महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स प्रा. लि.च्या कोलवॉशरीमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप होत आहे.

2024 पासून सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे पर्यावरणीय प्रदूषण वाढून कापूस, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जनावरांवर आणि नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. शासननियुक्त समितीने पंचनामा करून 68 लाख 61 हजार इतक्या नुकसानीची नोंद केली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तानाजी यादव यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

यावेळी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरीही त्यांच्यासोबत उपस्थित होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही या कोल वॉशरीची पाहणी केली होती. त्यावेळी तिथे काळया धुळीचे साम्राज्य दिसून आले होते. त्यानंतर चारच दिवसांनी मुनगंटीवारांनी स्वतः तक्रार केल्याने हे प्रकरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT