Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात... मुनगंटीवारांचा ठाकरेंवर पलटवार

Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी रविवारी मालेगावमध्ये जाहीर सभेत भाजपवर हल्लाबोल केला. त्याला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

रोहिदास गाडगे

Sudhir Mungantiwar Criticize Uddhav Thackeray : मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही मोदीच्या नावाने लढा मी माझ्या वडिलांच्या नावाने लढतो असे म्हणत भाजपाला चिमटा काढला. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले 'उद्धव ठाकरेंचे खरंय. आम्ही विकासाच्या, राष्ट्रवादाच्या नावावर लढतो. देशाचा गौरव वाढवा म्हणून लढतो. आमच्यात कोणालाही वडील मुख्यमंत्री आणि मुलगा पर्यावरणमंत्री असं सरकार चालवायचं नाही'.

तसेच 'त्यांनी ह्या जन्मातच नाही तर पुढच्या जन्मीही चांगल बोलावं ही आता आमची अपेक्षा नाही' असा पलटवार मुनगंटीवार यांनी केला आहे. आळंदी येथे महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार वितरण सोहण्यासाठी आलेले असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरेंच्या 'भ्रस्ट नेते पार्टी'च्या टिकेला प्रत्युत्तर

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मालेगावमध्ये जाहीर सभेत भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने नाव बदलून भ्रष्ट नेत्यांचा पक्ष असे ठेवावे. नेते आमच्याकडे असल्यावर भ्रष्ट असतात आणि त्यांच्याकडे गेल्यावर पवित्र होतात असा टोला ठाकरेंनी लगावला होता. त्यांच्या या टिकेला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेल्यामुळे समस्या'

मुनगंटीवार म्हणाले की त्यांच्या पक्षात असला की तो प्रामाणिक राहतो आणि आमच्याकडे आला की भ्रष्ट्र होतो, असं तर असू शकत नाही. जोपर्यंत स्वतःच्या पक्षात असला तोपर्यंत उत्तम आणि तुम्हाला पाठ दाखवली की भ्रष्ट. तुम्हाला तुमची खुर्ची दूर गेल्याच दुःख आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिजे ही जी भावना आहे यामुळे अशा समस्या उदभवतात अशी टीका यावेळी मुनगंटीवार यांनी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT