sudesh mayekar ratnagiri saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena : शरद पवार गटाला दणका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटास सुखद धक्का;जाणून घ्या काय घडलं कोकणात?

मंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी सामंत कुटुंबियांच्या समक्ष मयेकर यांनी सेनेत प्रवेश केला.

अमोल कलये

Ratnagiri News :

राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे (sharad pawar faction) माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर (sudesh mayekar ratnagiri) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा साेडचिठ्ठी दिली. मयेकर यांनी आज (बुधवार) शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. मला काेणत्याही पदाची अपेक्षा नसून आगामी काळात पक्ष देईल ती जबाबदारी निश्चित पार पाडणार असे मयेकर यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी उदय सामंत यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच उमेदवारानं आज शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एनसीपी अध्यक्ष शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांच्या शिवसेनेत झालेल्या प्रवेशामुळे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला माेठा धक्का मानला जात आहे.

सन 2019 मध्ये सुदेश मयेकर यांनी 32 हजार मतं सामंत यांच्या विरोधात मिळवली होती. त्याच सुदेश मयेकर यांनी आता उदय सामंत यांना साथ दिली आहे. सुदेश मयेकर यांनी रत्नागिरीचे नगराध्यक्ष पद देखील भूषविले आहे. उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी सामंत कुटुंबियांच्या समक्ष मयेकर यांनी सेनेत प्रवेश केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान स्थानिक राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांसमवेत माझे विचार जुळले नाहीत. तसेच अडचणींच्या काळात सामंत कुटुंबियांना मला दिलेला आधार हे देखील शिवसेनेत प्रवेश करण्याचे कारण असल्याचे मयेकर यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Shortage : नागपूरकरांसाठी महत्वाची बातमी! २ दिवस शहरातील पाणी पुरवठा राहणार बंद, कोणत्या परिसरांना बसणार फटका?

8th Pay Commisssion: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगार ₹१६,५६० रुपयांनी वाढण्याची शक्यता;वाचा सॅलरी कॅल्क्युलेशन

Maharashtra News Live Update: राज्यसभेत शरद पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

अंजनगाव पुतळा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून बाळराजे आवारे पाटील यांना अटक

Belly Fat: वजन होईल एका आठवड्यात कमी, सकाळच्या नाश्त्यात बनवा भाज्यांचे थालीपीठ

SCROLL FOR NEXT