बालविवाह  संजय डाफ
महाराष्ट्र

15 वर्षाची मुलगी, 18 चा मुलगा,बोहल्यावर चढण्याच्या तयारी असतानाच, लग्नाचा डाव उधळला

नागपूरच्या कळमना परिसरात 15 वर्षाची मुलगी तर 18 वर्षाच्या मुलाचा बालविवाह आयोजित करण्यात आला होता.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपुरात जिल्हा बाल संरक्षण समितीने एक बालविवाह रोखला आहे. नागपूरच्या कळमना परिसरात 15 वर्षाची मुलगी तर 18 वर्षाच्या मुलाचा बालविवाह (Child Marriage) आयोजित करण्यात आला होता.

मात्र या विवाहाची माहिती मिळताच नागपूरात (Nagpur) जिल्हा बाल संरक्षण समितीचे (District Child Protection Committee) सदस्य सदर विवाहस्थळी गेले आणि त्यांनी वर वधू बोहल्यावर चढण्याच्या तयारी असतानाच मंडपात पोहचून हा बालविवाह थांबवला. बाल संरक्षण समिती पथकाने वधू-वरच्या वयाचा दाखला मागताच नातेवाईकांचे धाबे दणाणले दाखले बघितल्यानंतर हा बालविवाह थांबविण्यात संबंधीत अधिकाऱ्यांना यश आलं.

म्हणून होतायत बालविवाह -

मुलगी अठरा वर्षाची झाल्यानंतर तिचा विवाह कायद्यानुसार करावा लागतो. अठरा वर्षांपेक्षा कमी वय असल्यानंतर लग्न केल्यास तो कायद्यानुसार (Marriage Act) गुन्हा ठरतो. हे माहीत असूनही या विवाह होणार होता. नुकतीच येऊन गेलेली कोरोना महामारी आणि यामुळं शाळेपासून वंचित राहिलेल्या खेड्यातील मुलांतं लवकर लग्न करून आपल्या जबाबदारीतून काही पालक मुक्त व्हायचा विचार करतायत आणि त्यामुळेच कदाचित बालविवाहाचं प्रमाण वाढलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT