उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती पदक संभाजी थोरात
महाराष्ट्र

उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती पदक

ठाणे जिल्हातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.

संभाजी थोरात

मुंबई : ठाणे जिल्हातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक नवनाथ ढवळे यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कामगिरीबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

नवनाथ ढवळे 2015-2017 या काळात गडचिरोली जिल्हा पोलीस दला ऑपरेशन उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमा यशस्वी केल्या. त्यातील मे 2016 मध्ये धानोरा उपविभागातील चातगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील हुर्रेकसा जंगल परिसरात नवनाथ ढवळे यांनी त्यांच्या टीमने कुप्रसिद्ध नक्षली रजिता उसेंडी हिचा खत्मा केला. उसेंडी हिच्यावर 139 गुन्हे दाखल होते. तिला पकडण्यासाठी 16 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

ही चकमक तब्बल 12 तास सुरु होती. श्री. ढवळे आणि त्यांच्या सहकार्यांनी जीवाची बाजी लावत ही कामगिरी केली होती. या कामगिरीची दखल घेऊन राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे.

मुळ अहमदनगर जिल्ह्यातील वडजिरे या गावातील असलेल्या नवनाथ ढवळे यांनी गडचिरोली, कराड, चिपळूण याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.ते सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक म्हणून काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेले कामही लक्ष्यवेधी ठरले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दौंडला भिमा नदीला आलेल्या पुरामुळे वीटभट्टांना पुराच्या पाण्याचा तडाखा

Vada Pav Recipe : पावसाची मजा दुप्पट होईल, घरीच बनवा मुंबई स्पेशल चटपटीत वडापाव

सासऱ्याचं घाणेरडं कृत्य! सुनेला जबरदस्ती दारू पाजली अन् नको के केलं; रेल्वे इंजिनिअरच्या काळ्या कृत्याने खळबळ

Kapoor Sisters: अंशुला कपूरच्या लग्नात 'कपूर सिस्टर्स'चा जलवा; जान्हवी, खुशी आणि सोनमचा ग्लॅमरस लूक व्हायरल

मुंबई-नांदेड प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नियमितपणे २ साप्ताहिक गाड्या सुरू, कुठे-कुठे असणार थांबा?

SCROLL FOR NEXT