Accident , Aurangabad , Boy, School , Bus Saam Tv
महाराष्ट्र

Accident : शाळेत निघालेल्या विद्यार्थ्याच्या सायकलला कारनं ठाेकरलं; मुलाच्या मृत्यूनं कुटुंबास बसला धक्का

आनंद हा तो एकुलता एक मुलगा हाेता.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Aurangabad : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात एका शाळकरी (student) मुलास कारनं ठाेकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने महालगावात शाेककळा पसरली आहे. पाेलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत. (Tajya Batmya)

वैजापूर जवळील बाजाठाण फाट्यावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत 14 वर्षीय शाळकरी मुलगा जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. आनंद अशोक जगताप असे मृत मुलाचे नाव आहे. आनंद हा वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील एका शाळेत नववीत शिक्षण घेत होता. (Aurangabad Latest Marathi News)

दररोज प्रमाणे आनंद सायकलने महालगाव येथे शाळेत जाण्यासाठी ताे निघाला असता बाजाठाण फाट्यावर पोहोचताच त्याला भरधाव कारने पाठीमागून जोरात धडक दिल्याने आनंद गंभीर जखमी झाला.

कार चालकाने त्याच वाहनातून आनंदला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. आनंद हा तो एकुलता एक मुलगा हाेता. या घटनेने जगताप कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Mumabi Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

Maharashtra News Live Update: सोलापुरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मौलानाविरुद्ध पॉकसो अंतर्गत गुन्हा

जन्म दाखल्यात ‘V-W’ गोंधळ, पालकांचा 370 किमी प्रवास, एका शब्दासाठी 15 दिवसांची वाट पाहा, महापालिकेचा अजब कारभार

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

SCROLL FOR NEXT