mid day meal , gondia saam tv
महाराष्ट्र

पोषण आहारात अळ्या, सोंडे आढळल्यानं पालकांनी काढला शाळेवर माेर्चा (पाहा व्हिडिओ)

हा पोषण आहार शाळांमध्येच शिजविला जात असून शाळेतील शिक्षकांच्या देखरेखीखाली काही महिलाच्या हातन अन्न शिजविले जाते.

अभिजीत घोरमारे

Gondia : शालेय पोषण आहारात चक्क अळ्या व सोंडे आढळल्यानं पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या (students) सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अळ्या व सोंडे असताना देखील अन्न शिजविण्यात आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये असा इशारा देखील देण्यात आला आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळा अंजोरा (gondia) येथे हा प्रकार घ़डला आहे.

राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाने माध्यान्ह भोजन देणे सुरू केले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याची शासनाची योजना आहे. हा पोषण आहार शाळांमध्येच शिजविला जात असून शाळेतील शिक्षकांच्या देखरेखीखाली काही महिलाच्या हातन अन्न शिजविले जाते. मात्र गाेंदिया जिल्ह्यातील एका शाळेतील धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अंजोरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून पुरविण्यात येणाऱ्या शिजवलेल्या भागात चक्क अळ्या व सोंडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली. ही बाब विद्यार्थ्यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी अन्न बाहेर टाकले. अन्यथा, या अन्न मुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असती. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आले असते. अंजोर वरिष्ठ प्राथमिक शाळेतील प्रकार पालकांना समजताच त्यांनी शाळेवर मोर्चा काढला.

दाेषींवर कारवाई व्हावी

आम्हांला शाळेत मधल्या सुटीत भोजन वाटप करण्यात आले. त्यात आम्हांला अळ्या व सोंडे दिसले त्यामुळे आम्ही ते अन्न टाकून दिले असे मोहन मेश्राम , समीर रहांगडाले यांनी सांगितलं. दरम्यान भुनेश्वर फुंडे यांच्यासह पालकांनी या घटनेची चाैकशी करुन दाेषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

SCROLL FOR NEXT