Gunaratna Sadavarte Saam TV
महाराष्ट्र

Satara: गुणरत्न सदावर्तेंविरोधात सातारा पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणा

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर ॲाक्टोबर २०२० मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात मराठा आरक्षणाप्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबात गुन्हा दाखल आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

सातारा : मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज सातारा पोलीस ठाण्यात आणलं असता मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून सदावर्तें विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानकावरील हल्ला प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयाने काल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तसंच या सुनावणीदरम्यानच सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला होता. त्यानुसार आज सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना सातारा पोलिसांनी त्यांना सातारा पोलीस ठाण्यात घेऊन आल्यावर काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

पहा व्हिडीओ -

सदावर्ते यांच्यावर ॲाक्टोबर २०२० मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात मराठा आरक्षण प्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना ताब्यात घेतले याचा आपण जाहीर निषेध व्यक्त करतो त्याच प्रमाणे ज्या समन्वयकांनी सदावर्तेंन विरोधात घोषणाबाजी केली याचे आम्ही समर्थनच करतो छत्रपतींच्या वंशजांबाबत चुकीच्या गोष्टी बोलायचा कुणाला अधिकार नाही असं वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक एड.उमेश शिर्के यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT