Dog attack Video Saam TV
महाराष्ट्र

Dog Attack on Boy: नागपुरात भटक्या कुत्र्यांचा 3 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Dog Attack Video: नागपूरातील वाठोडा अनमोल नगर परिसरातील ही घटना आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Viral Video : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. भटक्या कुत्र्यांचे हल्ले अनेकदा जीवघेणेही ठरले आहेत. नागपुरातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या व्हिडीओ आता समोर आला आहे. एका तीन वर्षांच्या मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सहा मोकाट कुत्र्यांनी चिमुकल्यावर हल्ला केला. नागपूरातील वाठोडा अनमोल नगर परिसरातील ही घटना आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात (Dog Attack)  चिमुकला जखमी झाला आहे. मात्र या घटनेनंतर मोकाट कुत्र्यांचं प्रश्न पुन्हा३ एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूर मनपा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी करणार असा सवाल आता नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नागपुरातील या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओतील दृष्यांनुसार, एक चिमुकला रस्त्यांना कुठेतरी निघाला होता. मात्र वाटेत सहा भटक्या कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. चिमुकल्याला काही कळाच्या आता एका मागून एक कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी या चिमुकल्याला अक्षरश: रस्त्यावरुन फरफटत नेलं. ही दृष्य थरकाप उडवणारी आहे. (Latest Marathi News)

चिमुकल्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक महिला तिथे धावत आली आणि तिन कुत्र्यांच्या तावडीतून या लहानग्याची सुटका केला. मात्र ही महिला तिथे वेळेत पोहोचली नसती तर पुढे काय झालं असतं, याचा विचारही करवत नाही.

कुत्र्यांच्या हल्ल्यात मृ्त्यूच्या घटना

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ल्या केला होता. या हल्ल्यात लहानग्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. मुलगा खेळत असताना कुत्र्यांनी हल्ला चढवला होता.

तर लखनौमध्ये एका पिटबुल कुत्र्याने वृद्ध महिलेवर हल्ला केला. यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला होता. गाझियाबादमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे पिटबुल कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT