stray dogs 
महाराष्ट्र

मिरज : संध्या किंचाळू लागली, तरीही कुत्र्यांनी तिला साेडलं नाही

विजय पाटील

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकांचा बळी गेल्यानंतर झोपी गेलेली महापालिकेची आरोग्य यंत्रणा जागी होणार आहे का ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.

सांगली : मिरज शहरांत दोन चिमुकल्यांवर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला चढवत जखमी केले आहे. यामध्ये एक सहा वर्षीय बालकाचा आणि आठ वर्षीय बालिकाचा समावेश आहे. सुमारे आठ ते दहा भटक्या कुत्र्यांनी या बालकांचे लचके तोडले आहेत. दरम्यान कुत्र्यांच्या हल्ल्यातून सुदैवाने हे दोन्ही चिमुकले बचावले आहेत. stray-dogs-attacked-child-in-sangli-marathi-news-sml80

मिरज शहरातील मालगाव रस्ता येथील एकता कॉलनीत संध्या शिवलिंग देवमाने (वय आठ) ही आजी शोभा यांच्या समवेत घराच्या पाठीमागे असणा-या शेतात गेलेली होती. तेथे दहा ते १२ भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. त्यामुळे संध्या घाबरली. कुत्र्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडण्यास केल्याने ती जाेर जाेरात किंचाळू लागली. आजी शाेभा यांनी हे पाहताच त्यांचा थरकाप उडाला. त्यांनी परिसरात जाऊन युवकांना बोलावून घेतले. या युवकांनी काठ्यांनी मारून कुत्र्यांच्या तावडीतून संध्याला वाचवले.

या हल्ल्यात संध्या गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान एका सहा वर्षाच्या बालकाचा कुत्र्यांनी चावा घेतल्याची आणखी एक घटना समोर आली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली हाेती. युवराज छळवादि असे कुत्र्यांनी चावा घेतलेल्या बालकाचे नाव आहे. या हल्ल्यात दोन्ही बालकांचे जीव वाचले असले तरी परिसरात माेठ्या प्रमाणात कुत्र्यांची दहशत निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.

दरम्यान ग्रामस्थांनी परिसरात असलेले चिकन दुकानदार त्यांच्या दुकानातील कचरा उघड्यावर, शेतात आणून टाकत असल्याने परिसरात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने चिकन दुकानदारांना समज द्यावी. तसेच भटक्या कुत्र्यांचा stray dogs बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणरायाला मोदक का आवडतात? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा

Maharashtra News Live Update: जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा

बुलढाणा जिल्हा बँकेत नवं समीकरण; अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र शिंगणेंची निवड, ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे कुटुंबाची ३१ वर्ष सत्ता

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला मिळणार रेल्वेची साथ; नव्या फ्रेट कॉरिडॉरचा मोठा प्लॅन!

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

SCROLL FOR NEXT