पिसाळलेला कुत्रा  SaamTvNews
महाराष्ट्र

हिंगोलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; सरपंच व ग्रामसेवकाने दुर्लक्ष केल्याचा गावकऱ्यांचा आरोप!

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत पाच जणांना चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संदिप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावात पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घालत पाच जणांना चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने तीन चिमुकल्या मुलांना व दोन प्रौढ नागरिकांना चावा घेतला आहे.

या पाच ही जखमींवर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या गावात एका गृहस्थाकडे पाळीव असणारा कुत्रा पिसाळला होता. त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे केली होती.

मात्र, पाच जणांना चावा घेऊन देखील कोणीच या गंभीर घटनेची दखल घेतली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावातील ग्रामसेवक व सरपंच यांनी या पिसाळलेल्या कुत्र्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अश्या घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये विदेशी महिलेसोबत असभ्य वर्तन, बाथरूमपर्यंत पाठलाग अन्....

Homemade Facepacks: उन्हाळ्यात चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे काढायचे? हे 5 घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

Maharashtra Live News Update: घमुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

Entertainment News : अभिनेत्याचा २७ व्या वर्षी मृत्यू, घरातच आढळला मृतदेह, नेमकं झालं काय?

MSRTC Jobs: तयारीला लागा! एसटी महामंडळात १८ हजार पदांसाठी बंपर भरती, प्रताप सरनाईकांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT