Aurangabad: एका नारळासाठी सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; औरंगाबादमधील विचित्र घटना Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: एका नारळासाठी सख्खा भाऊ झाला पक्का वैरी; औरंगाबादमधील विचित्र घटना

औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यामधील सिल्लोड तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यामधील सिल्लोड तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. याठिकाणी एका नारळावरून २ भावंडामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या भांडणामध्ये कुटुंबात इतर सदस्यांनी देखील उडी घेत, लाठ्या काठ्यांनी एकमेकांना झोडपले आहे. या मारहाणीमध्ये (beating) अनेकजण जखमी झाले असून दोघांनीही एकमेकांनविरोधात पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (Strange incident in Aurangabad crime)

हे देखील पहा-

पोलिसांनी दोघांच्या फिर्यादीवरून एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल (FIR) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. संबंधित घटना औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात कोटनांद्रा येथील गावामध्ये हा प्रकार घडला आहे. येथील रहिवासी असणाऱ्या शेख नबी शेख अब्दुल यांच्या शेतामध्ये एक नारळाचे झाड आहे. घटनेच्या दिवशी त्यांचा भाऊ शेख अली अब्दुल आणि शमीनाबी शेख अली यांनी एक नारळ तोडून आणला होता. याची माहिती शेख नबी शेख अब्दुल याला कळली.

या क्षुल्लक कारणातून २ भावांनी भांडायला सुरुवात केली. पण थोड्याच वेळात हा वाद इतका विकोपाला गेला आणि दोघां भावंडाच्या वादामध्ये चुलते, पुतणे, दीर आणि भावजयी देखील भांडणामध्ये उतरले. संबंधित सर्वांनी एकमेकांच्या घरात घुसून लाठ्या काठ्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केली आहे. एका नारळावरून सुरू झालेल्या या तुंबळ हणामारीमध्ये कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत.

दरम्यान एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात दगड घालून त्याला रक्तबंबाळ केले आहे. या विचित्र घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत ६ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीमध्ये जखमी झालेल्या सदस्यांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीचे कारण ऐकून पोलिसांनी देखील डोक्याला हात लावला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT