Jalna News : जालन्यात देवगिरी एक्सप्रेसच्या रेल्वे इंजिन ड्रायव्हर यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. रेल्वे ट्रकवर दगडांनी भरलेले लोखंडी ड्रम असल्याचे लक्षात येताच इंजिन ड्रायव्हरने इमर्जन्सी ब्रेक लावला. दरम्यान या घटनेनंतर रेल्वे पोलिसांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)
परतुर ते सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या उस्मानपुर गावाजवळ दगडांनी भरलेले लोखंडी ड्रम रेल्वे ट्रक वर असल्याचे लक्षात येताच देवगिरी एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने सतर्कता दाखवत रेल्वे 234 ते 235 किलोमीटर वेगाने असताना देवगिरी एक्सप्रेसचा इमर्जन्सी ब्रेक लावला. एक्सप्रेस थांबवल्याने मोठा अपघात होता होता टळल्याची घटना परतुर तालुक्यातील सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान असलेल्या उस्मानपुर गावाजवळ गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.
एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने सतर्कता दाखवल्याने मोठा अपघात टळला आहे. घटनेची माहिती ड्रायव्हरने परतूर रेल्वे पोलिसांना कळवताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हा ड्रम जप्त करत सहाय्यक उपनिरीक्षक परतुर रेल्वे सुरक्षा बल यांच्या तक्रारी वरून आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा (crime news) दाखल केला आहे.
या चौकशी दरम्यान हा लोखंडी ड्रम परिसरात सुरु असलेल्या रेल्वेचे इलेक्ट्रिकरणाच्या फाउंडेशनच्या कामासाठी आणलेले ड्रम मधला ड्रम असल्याची धकादायक माहिती समोर आली आहे.
या ड्रम मध्ये दगड भरून हा रेल्वे ट्रक वर कुणी ठेवला.? व का? ठेवला या बाबत रेल्वे सुरक्षा दल सहाय्यक उपनिरीक्षक सूर्यकांत साखरे हे तपास करत आहे. हा रेल्वे (railway) लुटीसाठी केलेला प्रकार तर नाही ना या बाबत ही संशय व्यक्त केला जात आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.