Jalna News Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: जालन्यात ST बस फोडली! दगडफेकीच्या घटनेनं खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Jalna Dhule Solapur Highway: जालन्यात अज्ञात आंदोलकांकडून बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. धुळे सोलापूर महामार्गावरील शिवाजीनगर जवळ बसची तोडफोड करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय शिंदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

जालन्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे अज्ञात आंदोलकाकडून एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. धुळे सोलापूर महामार्गावरील शिवाजीनगर जवळ बसची तोडफोड करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील धुळे सोलापूर महामार्गावरील शिवाजीनगर येथे ही थोडफोड करण्यात आली आहे. अज्ञात आंदोलकांकडून ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. हे एसटी बस संभाजीनगरहून बीडच्या दिशेने जात होती. यावेळी अज्ञात आंदोलकांनी अचानक या बसवर दगडफेक केली आहे.

ज्यावेळी बसवर दगडफेक झाली त्यावेळी या बसमध्ये जवळपास 32 प्रवासी हे प्रवास करत होते. सुदैवाने या दगडफेकीत कोणालाही दुखापत झालेली नाही, सगळे प्रवासी हे सुखरूप असल्याची माहिती आहे. दगडफेकीत या बसचे जवळपास 15 हजारांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. थोड्याच वेळात बसचे चालक हे पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT