Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यावर दगडफेक; डोकं फुटून रक्तबंबाळ

Ruchika Jadhav

विनोद जिरे

मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेल्या अमोल खुणे यांच्यावर दगडफेक झाली आहे. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील गढी ते माजलगाव रोडवर घडलीये. दगडफेकीत अमोल खुणे यांच्या डोक्याला मार लागला असून ते रक्तबंबाळ झालेत.

सदर घटनेनंतर उपस्थित व्यक्तींनी त्यांना तात्काळ गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आता या ठिकाणी मोठ्या संख्येने जमाव जमला असून तलवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील काही वेळात या ठिकाणी जबाब घेण्यासाठी दाखल होणार आहेत.

अमोल खुणे हे गेवराई येथून आपल्या गावी रुई धानोरा येथे निघाले होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. दरम्यान हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला? हे अद्याप समोर आले नसून पोलीस तपासातच हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा

6 जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतिनिमीत्त माध्यमांशी संवाद साधताना जरांगेंनी ही घोषणा केली. तसेच 6 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार आणि 5 जूनपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : Manoj Jarange: आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Rohit Sharma vs Hardik Pandya: रोहित पुन्हा बनणार मुंबईचा कर्णधार? मात्र या खेळाडूंकडून होतोय विरोध

Instagram Viral Video: अरे बापरे! भररस्त्यात अवतरली मंजुलिका, तरूणीचा खतरनाक डान्स VIDEO व्हायरल

Stone Ring: बोटात रत्नाची अंगठी घालण्यापूर्वी ह्या गोष्टी माहित आहेत काय़ ?

Eknath Shinde News | एकनाथ शिंदेंसमोरच ठाकरे गटाच्या पन्नास खोकेच्या घोषणा, शिंदेंनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT