Sambhajiraje Chhatrapati News Saam TV
महाराष्ट्र

...तर मुनगंटीवारांना हार घालेन; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरुन माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

'राज्यसभेची सहावी जागा हा महाविकास आघाडीचा विषय नाही. काँग्रेसची एक जागा, शिवसेनेच्या दोन जागा आणि राष्ट्रवादीची एक जागा आहे.'

संभाजी थोरात साम टीव्ही कराड

कराड : मागील अनेक दिवसांपासून राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन राज्यभरातील राजकारण तापलं आहे. आता राज्यसभेच्या या जागेबाबत काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राज्यसभेची सहावी जागा हा महाविकास आघाडीचा विषय नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

राज्यात राज्यसभेच्या (Rajya Election 2022) सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच तापलं होतं. या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र त्यांना भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा दिला नाही. तसंच मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नसल्याचं वक्तव्य संभाजाराजे यांनी आज केलं आहे.

हे देखील पाहा -

याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'राज्यसभेची सहावी जागा हा महाविकास आघाडीचा विषय नाही. काँग्रेसची एक जागा, शिवसेनेच्या दोन जागा आणि राष्ट्रवादीची एक जागा आहे. प्रत्येक पक्षाने ठरवायचं की उमेदवार कोण द्यायचा' असं ते म्हणाले आहेत. तसंच जर भाजपने संभाजीराजेंना उमेदवारी दिली तर, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच हार घालून स्वागत करेन, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी गादीचा मान वेगळा आणि तिकीट वेगळं असल्याचं वक्तव्य केलं होतं यावर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT