Chandrakant Patil/Dilip Walase Patil Saam TV
महाराष्ट्र

गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे-पाटील लेचेपेचे; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे-पाटील यांच नाव पवार कुटुंबातून समोर आलं होतं.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) लेचेपेचे आहेत मात्र, व्यक्ती म्हणून ते खूप चांगले आहेत, पवार कुटुंबातून गृहमंत्रीपदाबाबत वळसे पाटील यांचं नाव समोर आलं असल्याचं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत केलं. ते म्हणाले, मी शिवसेनेकडे गृहखाते ठेऊन घ्या म्हणालो होतो त्यावेळी माझी चेष्टा केली. तसंच संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचे कमी आणि पवाराचे जास्त आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेस (Congress) नेत्यांवरती हातात तलवार घेतली म्हणून पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हयांमुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत, एकीकडे सध्याचे गृहमंत्री कठोर कारवाई करत नसल्याने त्यांच्यावरती शिवसेना आणि काँग्रेस (Shivsena And Congress) नेत्यांची नाराजीचा सुर लावला असतानाच गृहमंत्रीपद शिवसेनेकडे येणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात जोरात सुरु होत्या. अशातच आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीनंतर गृहमंत्री उत्तम काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हंटल आहे.

हे देखील पहा -

या सर्व घाडामोडींवर भाष्य करताना मात्र गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे पाटील लेचेपेचे असल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. मात्र एक व्यक्ती म्हणून ते खूप चांगले असल्याचंही पाटील म्हणालेत. तसंच पवार कुटुंबातूनच गृहमंत्रीपदाबाबत वळसे पाटील यांचं नाव समोर आलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई मेट्रोच्या कार्यक्रम पत्रिकेत देवेंद्र फडणवीसांच (Devendra Fadnavis) नावं नसल्याच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, पुणे मेट्रोच्या उद्घाटनादरम्यान आम्ही असं केलं का? या सरकारचं मन मोठं नाही, यांना केवळ मोदी नावाची एलर्जी आहे. देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलवलं असतं तर चाललं असतं असही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fansache Cutlet Recipe : घरी 'असे' बनवा १० मिनिटांत फणसाचे कटलेट्स, एक घास खाताच पाहुणे करतील कौतुक

Bhajyanchi Amti Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत भज्यांची आमटी कशी बनवायची? पाहा ही सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: जोतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ झाडावर वीज कोसळली

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत फूट? वाद मिटविण्यासाठी दिग्गज नेत्यांच्या बैठका, VIDEO

Disabled Scholarship: राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ, शिशुवर्ग ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना दिलासा

SCROLL FOR NEXT