Rajesh Tope Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Corona: निर्बंध कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल - राजेश टोपे

राज्यात पहिल्या डोसचं 92 टक्के लसीकरण झालं असून 55 ते 60 टक्के दुसऱ्या डोसचं लसीकरण; राजेश टोपे यांची माहिती

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मुंबई-पुण्यातही देखील कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे पहायला मिळत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी ती पुन्हा खाली येईल.आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे अशी माहीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. ते जालन्यात बोलत होते.

हे देखील पहा -

सध्या राज्यात राज्य शासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्या-टप्प्याने कमी करण्यात येणार आहे असे देखील टोपे म्हणाले. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल. कोव्हॅकसीनचा राज्यात काही प्रमाणात तुटवडा आहे. तुटवडा पडू नये म्हणून केंद्राने काळजी घेण्याची गरज आहे.तसेच राज्यात पहिल्या डोसचं 92 टक्के लसीकरण झालं असून 55 ते 60 टक्के दुसऱ्या डोसचं लसीकरण झाल आहे अशी माहितीही टोपे यांनी दिली.

पुढे ते म्हणले की, 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना ICMR सांगेल तेव्हा लसीकरण सुरू केलं जाईल. जगात लहान मुलांपासून सर्वांचं लसीकरण करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय घ्यावा त्याची राज्य सरकार अंमलबजावणी करेल असे देखील टोपे यांनी सांगितले. राज्यात काही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ब्रेन स्टोन आढळून येत असल्याच समोर आल आहे. याबाबत निष्कर्षाअंतीच बोलता येईल असंही त्यांनी सांगितलं.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT