Ladki Bahin Yojana saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: चारचाकीनंतर नावातील त्रुटींची पडताळणी; 'या' लाडकींना नाही मिळणार 3 हजार

Ladki Bahin Yojana: चारचाकीनंतर आता लाडक्या बहिणींच्या नावातील त्रुटींची पडताळणी केली जाणार आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ कधी मिळणार? पाहा हा रिपोर्ट.

Girish Nikam

Ladki Bahin Yojana Updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांनुसार लाभार्थींची पडताळणीही सुरू आहे. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत. त्याची सध्या पडताळणी सुरू आहे. पण, आता ज्यांच्या नावात बदल, त्रुटी किंवा चुका आहेत. अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का? याची खात्री अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन केली जाणार आहे. या योजनेसाठी सध्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळेच अर्जांची काटेकोर पडताळणी केली जातेय.

त्यामुळे पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी-मार्चचा एकत्रित लाभ मिळेल, असे अधिकारी सांगत आहेत. या योजनेतील लाभार्थींसाठी सरकारला दरमहा सरासरी 3700 कोटी रुपये द्यावे लागतात. रक्कम वाढविल्यास दरमहा सुमारे 1200 कोटींचा अतिरिक्त भार तिजोरीवर पडणार आहे.

राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल, नव्या 10 योजनांमुळे तिजोरीवर वाढलेला कर्जाचा भार पाहता लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देणे अडचणीचे ठरू शकते, असा सल्ला नियोजन व वित्त विभागाने सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने रक्कम वाढीचा प्रस्तावच दिलेला नाही. सध्या योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी सुरू आहे.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे प्रत्येकी तीन हजार रुपये दिले जाईल, असेही सांगण्यात आले. अंगणवाडी सेविका त्यांची दैनंदिन कामे करुन पडताळणीचं काम करीत आहेत. चार-पाच प्रकारच्या याद्या शासन स्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने नव्या १० योजना जाहीर केल्या.

पण, सध्या लेक लाडकी, वयोश्री योजना, मुलींना मोफत उच्चशिक्षण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी पुरेशा प्रमाणात शासनकडून निधी मिळाला नसल्याने या योजनांचे लाभार्थी सध्या वेटिंगवर आहेत. जानेवारी, फेब्रुवारीत लाडकीचे ९ लाख लाभार्थीं कमी झालेत. मार्च महिन्यात लाडकीची संख्या आणखी कितीने घटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याचा काटेवाडीत निषेध; ग्रामस्थांचे जोडे मारो आंदोलन

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT