तामसा ( जिल्हा नांदेड ) : तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर लहान बालकांच्या बाधित होण्याचा धोका लक्षात घेऊन पेडियाट्रिक वॉर्ड तयार करण्यात आला. यामध्ये बालकाच्या मनोरंजनाची काळजी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी शासनाच्या दिशानिर्देशनानुसार पीएचसीमध्ये पेडियाट्रिक वार्ड तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड यांनी सहकारी डॉ. सचिन संगपवाड, डॉ. संगीता राठोड व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून हा वॉर्ड उभारला आहे. यामध्ये संभाव्य रुग्ण म्हणून येणाऱ्या बालकाच्या मनोरंजनाची विशेष काळजी करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोरोनामुक्त ग्रामीण भागात शाळा सुरू होणार
कोरोना व इतर आजारातून बालक लवकर तंदुरुस्त होण्यासाठी त्याचे मनोरंजन होणे आवश्यक असते. म्हणून पेडियाट्रिक वार्डमध्ये बालकाला खेळण्यासाठी खेळणी उपलब्ध केली असून त्याच्या आवडीचे बाहुल्या, फुगे, चेंडू आदी लोंबते ठेऊन मनोरंजनातून सजविण्यात आला आहे. झुलती आरामदायी खुर्ची व झुलता घोडा, आराम खुर्च्या बालकासाठी आकर्षण ठरणार आहे. आजारी बालक पेडियाट्रिक वार्डमधील मनोरंजन विश्वात रममाण होईल, यासाठी काळजी करण्यात आली आहे. वार्ड परिसरात बालकांचे कार्टून मित्र भीम, गोलू, डोरेमॉन आदींचे बॅनर लावण्यात आले आहे.
आजारी बालकाचे पीएचसीमध्ये उपचारादरम्यान मनोरंजन झाल्यास त्याची प्रकृती लवकर पूर्ववत होण्यास हातभार लागणार. येथे येणारा रुग्ण व त्याच्या नातेवाईक पेडियाट्रिक वॉर्डमधील सजावटीचे कौतुक करुन समाधान व्यक्त करीत आहेत. या वार्डच्या देखरेखीसाठी डॉ. रामदास बोंदरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी नियुक्त करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम यांनी येथील पीएचसीमधील पेडियाट्रिक वॉर्डच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.