ST Workers Strike SAAM TV
महाराष्ट्र

ST Workers: खामगावमध्ये २५० एसटी कर्मचारी एकाच वेळी कामावर रुजू, पण...

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आगारातील २५० कर्मचारी एकाच वेळी रुजू झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

- संजय जाधव

बुलडाणा: मागील साडेपाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी संपावर आहेत. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तरीही कर्मचारी मागणीवर ठाम असून, न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत त्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज, सोमवारी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आगारातील २५० कर्मचारी एकाच वेळी रुजू झाले आहेत. मात्र, हे एसटी कर्मचारी आजही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे सांगत आहेत. तसेच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत आपण आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

साडेपाच महिन्यांच्या आंदोलनानंतर एसटी महामंडळाला आता पुन्हा सुगीचे दिवस येणार आहेत. उच्च न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होण्याचे निर्देश दिल्यानंतर, आज सोमवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव एसटी आगारामध्ये एकाच वेळी २५० कर्मचारी कामावर रुजू झाले. तत्पूर्वी कर्मचाऱ्यांनी 'कर्मचारी एकजुटीचा विजय असो' यांसह 'गुणवंत सदावर्ते तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा दिल्या.

तळेगावमध्येही सर्व कर्मचारी रुजू

मागील साडेपाच महिन्यांपासून बंद असलेली लालपरी आज मावळमधून धावली. तळेगाव एसटी आगारातील सर्व एसटी कर्मचारी (ST Employee Strike) आजपासून कामावर रूजू झाले. पुन्हा कामावर रूजू झाल्यानंतर त्यांना आनंद झाला होता. तळेगाव एसटी आगारातून आज पहिली एसटी बस पंढरपूरकडे रवाना झाली. पहिलीच एसटी पांडुरंगाच्या इथे जात असल्याने लवकरात लवकर आमच्या मागण्या सरकारनं मान्य करू दे, असं साकडं पांडुरंगाच्या चरणी घातलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT