Free ST Bus Service Saam TV
महाराष्ट्र

Free ST Bus Service: या आजाराने त्रस्त असलेल्या प्रवाशांना एसटीचा प्रवास मोफत; रुग्णांसाठी महामंडळाकडून मोठी सवलत

खासगी वाहन करून जाणे परवडणाने नसल्याने एसटी महामंडळाकडून या रुग्णांसाठी मोफत एसटीचा प्रवास ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

दीपक क्षीरसागर

Free ST Bus Service: एसटी महामंडळाने सिकलसेल रुग्णांसाठी मोठी सवलत दिली आहे. सिकलसेल हा रक्ताच्या पेशींचा आजार असून, रुग्णांना उपचारासाठी शहरात जावे लागते. त्यामुळे त्यांची सोय होण्यासाठी एसटी महामंडळाकडून सिकलसेल आजार असलेल्या रुग्णांना एसटीच्या मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Latetst Marathi News)

सामाजिक बांधिलकी म्हणून विविध योजनांच्या माध्यमातून सवलतीच्या दरात प्रवाशांना सेवा देत आहे. यात ३० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत लाभार्थ्यांना प्रवास करताना सवलत दिली जाते. सिकलसेल हा रक्तातील लाल रक्तपेशींचा आजार असून, ग्रामीण भागात उपचाराची सुविधा नसल्याने रुग्णांना शहरात उपचार घेण्यासाठी वारंवार जावे लागते. त्यातच खासगी वाहन करून जाणे परवडणाने नसल्याने एसटी महामंडळाकडून या रुग्णांसाठी मोफत एसटीचा प्रवास ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

त्यानुसार जिल्ह्यात सिकलसेल रुग्ण या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन एसटी (ST Bus) महामंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, महामंडळाच्या या सेवेचा सिकलसेस रुग्णांना (Patient) लाभ होत असून, अनेकजणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सिकलसेल बाधित रुग्णांना आणि एका नातेवाइकांना उपचारासाठी स्वतःच्या गावापासून शहरात जाण्यासाठी दर महिन्याला दीडशे किलोमीटरपर्यंत मोफत प्रवासाची सवलत दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT