संपानंतर ST रुळावर; मात्र सुविधांकडे लक्ष कोण देणार? SaamTvNrews
महाराष्ट्र

संपानंतर ST रुळावर; मात्र सुविधांकडे लक्ष कोण देणार?

बीड बसस्थानकात प्रवाशांसाठी साधी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही..

विनोद जिरे

बीड : राज्यात बऱ्याच काळापासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) अखेर संपुष्टात आला. संपकरी एसटी कर्मचारी व महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) विलीनीकरणावरून बराच संघर्ष झाला. या ४ महिन्यांपेक्षाही अधिक काळात महाराष्ट्रातील जीवनवाहिनी असणारी लालपरीची चाके थांबली होती. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांची (Passengers) यामुळे प्रचंड गैरसोय झाली.

हे देखील पहा :

मात्र, हायकोर्टाच्या (Mumbai Highcourt) निर्णयानंतर एसटी कर्मचारी (ST Employee) पुन्हा कामावर परतत आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता ग्रामीण भागातील लालपरी रुळावर आली आहे. गाव खेड्यातील, वाड्या तांड्यावरील सामान्य नागरिकांच्या प्रवासाचा प्रश्न जरी सुटला असला, तरी बस स्थानकाच्या आवारातील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांकडे, मात्र एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बीड (Beed) शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात (Bus Stop) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतेचा अभाव, महिला सुरक्षेचा प्रश्न, रात्री लोडशेडिंग झाली असता बस स्थानकात संपूर्णपणे अंधार असतो. यामुळे या समस्येकडे कधी लक्ष्य देणार? असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलविरुद्ध दम भरला|VIDEO

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

SCROLL FOR NEXT