सदावर्ते यांच्या अटकेचा ST कर्मचाऱ्यांकडून निषेध  SaamTvNews
महाराष्ट्र

सदावर्ते यांच्या अटकेचा ST कर्मचाऱ्यांकडून निषेध

खामगावात शरद पवारांबाबत संतप्त प्रतिक्रिया

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा : एसटी कामगारांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना त्यांच्या राहत्या घरून पोलिसांनी अटक केली. तसेच सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना २ दिवसांची पोलीस कोठडीही न्यायालयाने सुनावली आहे. सदावर्ते यांच्या अटकेच्या निषेधार्थ खामगांव येथील एसटी कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

हे देखील पहा :

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. दुपारी झालेल्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी 107 लोकांना अटक केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे (St Worker) वकील ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. काल आझाद मैदानावरती एसटी कर्मचाऱ्यांना लाठीचार्ज करण्यात आला तसेच ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली ही सुद्धा अत्यंत दुर्दैवी बाब असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जाहिर निषेध नोंदवण्यासाठी एकत्र जमल्याचे एसटी कर्मचारी म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Post Offer: शंभर आमदार आणा अन् मुख्यमंत्री व्हा! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सीएम पदाची ऑफर

Maharashtra Live News Update: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मृत महिलेचा आढळला

Viral Video: इच्छा असेल तर...; विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर चिकटवली २०० रुपयांची नोट, लिहिलेली शायरी वाचून पोट धरून हसाल

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

SCROLL FOR NEXT