नागपूरात एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न संजय डाफ
महाराष्ट्र

नागपूरात एसटी चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

लोखंडी खांबावर चढून या चालकाने उडी मारण्याचा प्रयत्न केला.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : अहमदनगर जिल्ह्यातीलशेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. ही घटना ताजी असताना नागपूर मधील गणेशपेठ परिसरातील डेपोमध्ये एका परिवहन महामंडळाच्या चालकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कमलेश ठाकरे असे या चालकाचे नाव आहे.

हे देखील पहा -

लोखंडी खांबावर चढून या चालकाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी कर्मचारी वेळीच पोहचल्याने अनर्थ टाळला. मागण्या मान्य झाल्या असल्या तरी एसटी कर्मचारी आर्थिक संकटात असल्याने ठाकरे यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे समजते. या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विविध मागण्यांना घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. काही मागण्या मान्य केल्याने संप मागे घेण्यात आला. मात्र, असे असले तरी नागपूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. कमलेश यांनी झाडावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न.या कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल; नवीन मंत्र्यांना खातेवाटप मिळताच राजकारण तापलं

DC vs RR: दिल्लीच्या विजयानं प्लेऑफमधील चुरस वाढली; स्टार्क आणि राहुल ठरले विजयाचे शिल्पकार

Maharashtra News Live Update: परभणीत उन्हाचा कहर, तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT