ST Strike : महामंडळाने पाठवली कारणे द्या नोटीस; कारवाईच्या भितीने ST चालकाची आत्महत्या संभाजी थोरात
महाराष्ट्र

ST Strike : महामंडळाने पाठवली कारणे द्या नोटीस; कारवाईच्या भितीने ST चालकाची आत्महत्या

वारंवार आवाहन करूनही कामावरती परत रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने (ST Corporation) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : जवळपास मागील अडीच महिन्यापासून ST कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून या संपान आता अनेक वेगवेगळी वळण घेतली आहेत. अनेक जण आदोलन सोडून गेले तर अनेकांच निलंबण केलं आहे. एसटी महामंडळाने वेतनवाढ व इतर मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतरही विलनीकरणाच्या मागणीवरती कर्मचारी ठाम असल्याने महामंडळासह सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे.

आता राज्यातील जेष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) मध्यस्ती केली तरी देखील कामगार आपल्या संपावरती ठाम आहेत त्यामुळे आंदोलनावरती तोडगा निघण कठीण असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान सतत आवाहन करून कामावरती परत रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर (Employee) एसटी महामंडळाने (ST Corporation) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.

हे देखील पहा -

अशातच काल कोल्हापूर (Kolhapur) एसटी महामंडळाकडून आलेल्या नोटीशीमुळे, एका एसटी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धनाजी वायदंडे असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं (ST staff) नाव असून ते गारगोटी आगारात कार्यरत होते. कालच धनाजी यांना महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस आली होती आणि कारवाईच्या भीतीने आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप केला आहे. तर जिल्ह्यातील हा एसटी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसातील दुसरा बळी आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT