Breaking News : वेळेवर पगार होत नसल्याने ST चालकाने संपवले जीवन! भूषण अहिरे
महाराष्ट्र

Breaking News : वेळेवर पगार होत नसल्याने ST चालकाने संपवले जीवन!

आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी एसटी महामंडळाला जबाबदार धरले आहे.

भूषण अहिरे

धुळे : वेळेवर पगार होत नसल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कमलेश बेडसे असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.

हे देखील पहा -

तर मृत बस चालकाच्या नातेवाईकांनी एसटी महामंडळास दोषी ठरवत एसटी महामंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

कमलेश बेडसे (45) चालक म्हणून एसटी महामंडळामध्ये सेवा देत होते. गेल्या काही महिन्यांपासून वेळेवर पगार होत नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागयत होता. आर्थिक अडचणींमुळेच त्यांनी जीवन संपविले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी एसटी महामंडळाला जबाबदार धरले आहे. या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी साक्री डेपो बंद करून कुठलीही बस, बस स्थानकावर येण्यास अथवा स्थानकातून जाण्यास मज्जाव केला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: बीडमध्ये चाललंय काय? आश्रम शाळेत अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्याचा छळ, नवऱ्याला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Pune Metro: पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी -शिवाजीनगर मेट्रो 'या दिवशी होणार सुरू, पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार

Sonam Wangchuk Hunger Strike : "खऱ्या रँचोसाठी आवाज उठवलाच पाहिजे...", बॉलिवूड अन् मराठी कलाकारांचा सोनम वांगचुक यांना पाठिंबा | VIDEOS

Maharashtra News Live Update: धाराशिव जिल्ह्यातील बोगस बियाणं व बोगस खताचा मुद्दा तापला

Tech Tips : तुम्हाला माहित आहे का? फोनच्या कॅमेरा जवळ छोटे छिद्र का असते ?

SCROLL FOR NEXT