लालपरीचा प्रवास महागणार Saam Tv
महाराष्ट्र

ST Bus fares : लालपरीचा प्रवास महागणार? १०० रुपयांमागे १५ रुपये तिकीट वाढण्याची शक्यता

Bus fares and fare structure of bus services : एसटी बसच्या तिकीटामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल, असे समजतेय.

Namdeo Kumbhar

ST Bus Ticket Price : महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे संपले आहे. सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाकडून नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीच्या तिकीटदरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० रुपायांमागे १५ रुपये तिकीट वाढण्याची शक्यता आहे.

मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट दरांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही, असे सांगत एसटी महामंडळाकडून दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय. एसटी महामंडळाने १४.१३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसटीच्या दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

एसटी महामंडळाचा १४ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारने स्वीकारल्यास १०० रुपयांच्या तिकीटामागे १५ रुपये अधिक मोजावे लागतील. मिळालेल्या माहितीनुसार, उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे एसटीकडून दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. याआधी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी तिकीटदरवाढ झाली होती. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी दरवाढीचा निर्णय घेणार का? याकडे लक्ष लागलेय.

यवतमाळ जिल्हा प्रशासनावर एसटीची अडीच कोटींची उधारी

यवतमाळ जिल्ह्यातील सात विधानसभा निवडणुकीत एकूण 265 बसेसची मागणी यवतमाळ विभागाकडे नोंदविण्यात आली होती. त्यानुसार मतदानाच्या आदल्यादिवशी 19 व 20 नोव्हेंबर रोजी एसटी बसेस उपलब्ध करून दिली या बसेसची एकूण देयके 80 लाखाची आहे. प्रत्यक्षात मात्र प्रशासनाने एसटीला 50 लाख रुपये उपलब्ध करून दिले असून काही महिन्यापूर्वी यवतमाळात शासकीय कार्यक्रम पार पडला त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात बसेसचा पुरवठा करण्यात आला त्यापैकी देखके अनेक महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहे थकबाकीची रक्कम अडीच कोटीच्या घरात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

Kalyan Toilet Protest : १२ हजार जणांच्या लोकवस्तीत एकच शौचालय, नागरिकांचं थेट आयुक्तांच्या दालनाबाहेर 'टॉयलेट' आंदोलन

SCROLL FOR NEXT