Pune : एसटी बसने दुचाकीला चिरडले Saam Tv
महाराष्ट्र

ST Bus Accident : कन्नड घाटात थरार! एसटी बसचा स्टेअरिंग रॉड जॅम झाला अन्...; ५९ प्रवाशांचा जीव वाचला

ST bus steering rod breaks in Kannad Ghat Maharashtra : कन्नड घाटात छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटल्याने बसचे नियंत्रण सुटले. बस कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

Namdeo Kumbhar

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

Kannad Ghat ST Bus Accident : छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा कन्नड घाटात स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटल्याने बसचे नियंत्रण सुटल्याची थरारक घटना आज सकाळी घडली. सुदैवाने, नियंत्रण सुटलेली बस घाटातील सरंक्षक कठड्याला अडकून थांबल्यामुळे मोठा अपघात टळला. या बसमध्ये तब्बल ५९ प्रवासी होते. या भीषण प्रसंगातून सर्व प्रवाशांचा जीव वाचला असून ४ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

घाटातील भीषण दुर्घटनेतून प्रवासी सुरक्षितपणे बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. घटनेत किरकोळ जखमी झालेल्या चार प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उर्वरित सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बसबाहेर काढले.

दरम्यान, कन्नड घाटातील या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या बस देखभाल आणि दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बसचा स्टेअरिंग रॉड जॅम होऊन कसा तुटला? या प्रवासापूर्वी बसची योग्य तांत्रिक तपासणी झाली होती का? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सुदैवाने या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी प्रशासनाने अशा तांत्रिक त्रुटींकडे वेळीच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अचानक धनलाभ अन् नोकरीत भरभराट! केतु ३ राशींना बनवणार श्रीमंत, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

8th Pay Commission: पगार अन् पेन्शनवाढीसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा! कर्मचाऱ्यांनी 'या' तारखेकडे ठेवा लक्ष

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

खासगी क्लासच्या सहलींसाठी कडक नियमावली करा; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

15 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT