विश्वभूषण लिमये, साम टीव्ही सोलापूर
सोलापुरमध्ये भरधाव एसटी बस उलटल्याची घटना समोर आलीय. चालकाला फिट आल्यामुळे एसटी बसचा भीषण अपघात झालाय. सोलापूर जिल्ह्यात एसटी चालकाला फिट आल्यामुळे भरधाव वेगात असलेली एसटी बस पलटी झाली अन् रस्त्याखाली जावून कोसळल्याचं समोर आलंय. यावेळी चालकाला केबिनवरच सीपीआर दिल्याची माहिती मिळत आहे.
एसटीचा अपघात
एसटी बसचा हा भीषण अपघात टेंभुर्णी कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ (ST Bus Accident) झालाय. एसटी चालकाला फिट येऊन तोल गेल्यामुळे एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. टेंभुर्णीवरून कुर्डूवाडीला जात असताना ही घटना घडली आहे. या एसटीबसमध्ये ३५ ते ४० प्रवासीकरत असल्याची माहिती मिळतेय.
भरधाव बस उलटली
एसटी पलटी झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव (Solapur News) घेतली. प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आलं. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले होते. त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यामुळे जखमींना कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गाडी पलटी झाल्यावर, गाडीच्या टपावरच चालकाला सीपीआर दिल्याचं दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. सोलापूर जिल्ह्यात ही घटना आज सकाळी घडलेली आहे.
प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ
धावती बस अचानक उलटल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला (Solapur Accident) होता. भीतीमुळे प्रवाशांमध्ये आरडोओरडा निर्माण झाला होता. स्थानिकांनी तातडीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातामध्ये जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु बसचं मोठं नुकसान झाल्याचं दिसत (Accident News) आहे. एसटी ड्रायव्हरला अचानक फीट आल्यामुळे बस पलटी झाल्याची घटना घडलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.