लातुरात एसटीला लागला ब्रेक, जिल्ह्यातील 5 आगरासमोर उपोषण सुरू! दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

लातुरात एसटीला लागला ब्रेक, जिल्ह्यातील 5 आगरासमोर उपोषण सुरू!

एसटी कर्मचाऱयांच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक संकटात असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी सरकारकडे करण्यात येत आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : आज सकाळपासून लातुर जिल्ह्यातील 5 आगारातील वाहतूक ठप्प झाली आहे. काल एसटी कर्मचारी कृती समितीने बेमुदत आंदोलन सुरू केलं आहे. काल रात्रीला मुक्कामी गेलेल्या बसेस परत आल्यानंतर त्या सुद्धा आगारात बसेस लावून बंद सुरू केला आहे.

हे देखील पहा :

राज्य कर्मचाऱ्यांना वेतन भत्ते सुविधा मिळतात त्यापासून वंचित राहावे लागत असल्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळ कमी वेतन श्रेणी देत आहे तर देशात महागाईचा भस्मासुर वाढत असल्याने जगन कठीण झाले आहे. यापूर्वी अनेकदा एसटी कर्मचारी संघटनांनी शासनाला निवेदन उपोषण संप करून देखील दखल घेतली नाही.

यामुळे आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आंदोलनाची दखल घ्यावी ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक संकटात एसटी बंद असल्याने न्याय द्यावा अशी मागणी गोर्वधन सोळुंके, गोपाळ गडीकर, फिरोज सय्यद, बालाजी शिरशे, सुरेखा घोगरे, लक्ष्मण पौळकर रेखा जाधव मीरा चव्हाण आदी एसटी कर्मचारी करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Maharashtra News Live Update: जरांगे पाटलांच्या आंदोलनावर शंभूराज देसाईंचे स्पष्टीकरण; म्हणाले, “त्यांना अर्धसत्य माहिती मिळतेय”

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

Pink Sauce Pasta Recipe: रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी आणि चटपटीत 'पिंक सॉस पास्ता' घरीच बनवा; वाचा रेसिपी

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

SCROLL FOR NEXT