केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेबाबत वेळापत्रक जाहीर केले
महाराष्ट्राचा संबंधित SSR वेळापत्रकात समावेश नाही
प्रारूप मतदार यादी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार
अंतिम मतदार यादी ४ जानेवारी २०२७ रोजी प्रसिद्ध होणार
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SSR प्रक्रिया राबवण्याची घोषणा केली आहे. या प्रक्रियेमुळे नवीन मतदारांना नोंदणी करता येणार असून, मतदार यादीतील नाव, पत्ता आणि इतर आवश्यक दुरुस्तीही करता येणार आहे. मात्र, या यादीत महाराष्ट्राचा समावेश नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रासह आणखी १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR प्रक्रिया सुरू आहे तसेच काही ठिकाणी ती प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे या राज्यांसाठी SSR प्रक्रियेचं वेळापत्रक स्वतंत्रपणे नंतर जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे.
वेळापत्रकानुसार, संबंधित १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोव्हेंबरपासून SSR प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदारांना मतदार यादीतील आपली माहिती तपासता येईल. नागरिकांना मतदार म्हणून नव्याने नोंदणी करता येईल, तर नावातील चुका, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्याचीही संधी मिळेल. १२ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर मतदारांना यादी तपासून आवश्यक दावे आणि हरकती नोंदवता येतील. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ जानेवारी २०२७ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.
SSR म्हणजे विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण. यामध्ये मतदार यादी अद्ययावत करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि माहितीतील चुका दुरुस्त करणे यावर भर असतो. तर SIR म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण. या प्रक्रियेत मतदार यादीची अधिक व्यापक तपासणी केली जाते. दरम्यान, महाराष्ट्रातील मतदारांना SSR प्रक्रियेचं स्वतंत्र वेळापत्रक कधी जाहीर होणार, याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे राज्यातील आगामी पुर्ननिरीक्षण प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाच्या पुढील घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.