SSC HSC Exam 2022 Offline
SSC HSC Exam 2022 Offline Saam Tv
महाराष्ट्र

SSC HSC Exam 2022: 10 वी-12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी

पुणे : राज्यात दहावी (SSC) आणि बारावीची (HSC) परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन (Offline) होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाइन परिक्षांवर (Exam) ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार आहे. बुधवारी राज्य शिक्षण मंडळाची (State Board of Education) विभागीय मंडळांसोबत ऑनलाइन (Online) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार ७५ टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. (SSC HSC Board exam offline only)

हे देखील पहा-

मुंबई (Mumbai), नागपूर, पुणे (Pune) आदी शहरामध्ये ‘परीक्षा पुढे ढकला अन्यथा ऑनलाइन घ्या’, म्हणत विद्यार्थी (Student) रस्त्यावर आले होते. यानंतर ऑनलाईन परीक्षा घ्यावी असा एक मतप्रवाह तयार झाला होता. मात्र, यावर बोर्डाने ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी पुण्यात देखील बोर्डाने दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, यामध्ये परीक्षेची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी मुख्य परीक्षा केंद्र निश्चिती पूर्ण झालेली आहे.

विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन आणि मार्गदर्शनाकरिता शिक्षण विभागातर्फे हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. ऑफलाइन परीक्षेला सर्वच विद्यार्थ्यांचा विरोध आहे असे अजिबात नाही. परीक्षेला आणखी वाढीव वेळ देणे यासह अन्य पावले उचलून ऑफलाइन परीक्षा अधिक सुटसुटीत करणे शक्य आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; कोणत्या मार्गावरील सेवा असणार बंद? कोणत्या मार्गावर विशेष सेवा?

Kolhapur News: 'साम टीव्ही'चा लोगो वापरून प्रेक्षकांची दिशाभूल करणारा व्हिडिओ केला व्हायरल, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल

Today's Marathi News Live : संभाजीनगर शहरात गॅस सिलिंडरचा स्फोटानंतर लागली आग

Special Report : कोकणात रंगणार ठाकरे विरूद्ध ठाकरे लढाई, सभांचा झंझावात

SCROLL FOR NEXT