Gadchiroli Crime News Saam TV
महाराष्ट्र

पुण्याहून गडचिरोलीला बंदोबस्तासाठी गेलेल्या SRPF जवानांनी झाडल्या गोळ्या; दोघांचा मृत्यू

श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी या मृत जवानांची नावे असून, दोघंही दौंड पुणे येथील SRPF कॅम्पचे जवान होते.

संजय तुमराम

गडचिरोली : राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन जवानांनी एकमेकांवर केला गोळीबार केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) घडली आहे. एकमेकांवर गोळीबार केलेले हे दोन्ही जवान पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथे तैनातीस होते. दोघांच्या वैयक्तिक वादातुन एकमेकांवर रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हे देखील पाहा -

या गोळीबारात दोन्ही जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. श्रीकांत बेरड व बंडू नवथरे अशी या मृत जवानांची नावे असून दोघंही दौंड पुणे येथील SRPF कॅम्पचे जवान होते. घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) पाठविण्यात आलं आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT