- राजेश भोस्तेकर
रायगड : नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५२ वा पुण्यतिथी सोहोळा आज शुक्रवार दि २५ फेब्रुवारी २०२२ रोजी उमरठ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाचा सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे शौर्य सेवा पुरस्कार २०२२ पद्मश्री डॉ . हिंमतराव बावस्कर यांना देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी पुण्यतिथी सोहळ्यामध्ये चित्ररथांचे खास आकर्षण दिसून आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती पोलादपूर, नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उंबरठ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
हे देखील पहा :
महाड पोलादपूरचे आ. भरत गोगावले, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे, संजय यादवराव, यांनी तानाजी मालुसरे समाधीस्थळी अभिवादन केले. नरवीर तानाजी मालुसरे याच्या पुण्यतिथी सोहळ्यास चित्ररथ तयार करण्यात आला होता. छत्रपतींचा इतिहास, पोलादपूरसह कोकणातील महत्वाची पर्यटन स्थळे, युध्द साहित्य व क्षेपणास्त्रे, पोलादपूर तालुक्यातील शहिदांची गाथा, निसर्ग संपदा, झुलता पूल, मोरझोत धबधबा व भीमाची काठी लाईव्ह या चित्रांचा चित्ररथ तयार करण्यात आला होता.
सोहळ्यानिमित्त मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके तसेच पोवाडा, महिलांचे हळदीकुंकू, महिला मेळावा, खुल्या कबड्डी स्पर्धा, आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. नैसर्गिक आपत्ती काळात मदतीचा हात देणाऱ्या संस्थांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.