Saam TV News Man Kills Wife With Tile Slab
महाराष्ट्र

सोलापूरात नवऱ्यानं बायकोच्या डोक्यात फरशी मारली; जागीच मृत्यू, कारण फक्त.. नक्की काय घडलं? | Crime

Man Kills Wife With Tile Slab: दक्षिण सोलापूरच्या हत्तूर गावात पतीने किरकोळ वादातून फरशी डोक्यात घालून पत्नीची हत्या केली. महिलेचा जागीच मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Bhagyashree Kamble

घरगुती वादातून नवऱ्यानं बायकोची निर्घृण हत्या केली आहे. पतीनं पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. नंतर मारहाणही केली. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना दक्षिण सोलापुरात घडली आहे. या घटनेची माहिती विजापूर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी करत पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गौराबाई नीलकंठ पाटील असे मृत महिलेचं नाव आहे. तर, नीलकंठ भीमराव पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे. हे जोडपं  दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. गौराबाई आणि नीलकंठ यांना दोन विवाहित मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून, त्यांच्यातक क्षुल्लक कारणावरून वाद सुरू होता.

'तू शेतात न येणारी आज कशी आलीस' असा जाब विचारत पतीनं पत्नीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. दोघांमधील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात पतीनं पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. तसेच मारहाणही केली. या मारहाणीत पीडित महिला रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

गौराबाई काही दिवस मुलाकडे राहत होत्या. गावाला जाणे येण्याच्या कारणावरून पती-पत्नीत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच गौराबाई यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबई हादरली! १० वर्षाच्या मुलासमोर महिलेवर बलात्कार; गळ्यावर कोयता ठेवून तडीपार गुंडाचं भयंकर कृत्य

Ketan Agarwal Case: जीव घेणे सोपं झालं का? पुण्यातल केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्री संतापली

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

SCROLL FOR NEXT