Crime news Saam tv
महाराष्ट्र

ज्या आजीने लाड पुरविला, त्याच आजीच्या जीवावर उठला, सोलापुरातील संतापजनक घटना

Solapur Crime : माझं लवकर लग्न का लावून देत नाही, असे म्हणत नातवाने आजीला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : माझं लवकर लग्न का लावून देत नाही, असे म्हणत नातवाने आजीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत आजीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी ही संतापजनक घटना सोलापूर (Solapur Crime) शहरातील आदर्श नगर, मित्र नगर शेळगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी नातवाविरुद्ध सोलापुरातील जोडभावी पोलीस ठाण्यात (Solapur Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मालनबी हसनसाहब नदाफ असं मृत पावलेल्या आजीचे नाव आहे. तर, सलीम जहाँगीर नदाफ असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सलीम नदाफ हा कर्नाटकात जिरंकली येथे बिगारीचे काम करतो. त्याचे लग्न करण्यासाठी मुली पाहण्याचे काम सुरू होते. आजी मालनबी हसनसाहब नदाफ यांनी सलीम नदाफ याला सोलापुरात मुलगी पाहण्यासाठी बोलावून घेतले होते. तो सोलापुरात आला आणि काही ठिकाणी त्याने मुली पाहिल्या. मात्र,लग्न जुळत नसल्याने तो तणावात आला होता.

दरम्यान,आजी मालनबी नदाफ या घरासमोरील पटांगणात फरशीवर बसल्या असताना सलीम नदाफ घरी आला आणि त्याने आजीला तू माझे लग्न का लावून देत नाही ? उगाच मला कर्नाटकातून येथे का बोलावून घेतली, असा जाब विचारला.

दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात सलीम नदाफ याने आजीच्या डोक्यात लाकडी काठीने प्रहार केला. यामध्ये मालनबी नदाफ या जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता,त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी फिरोज शकुर नदाफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीम नदाफ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून जिल्हा न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT