जावई रुसले अन थेट तुरुंगात जाऊन बसले ! लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

जावई रुसले अन थेट तुरुंगात जाऊन बसले !

जाफराबाद तालुक्यातील सोनखेडा-भराडखेडा गावात कौटुंबिक वादातून एक जण उच्चदाबाच्या विद्युत टॉवरवर चढल्याची घटना काल समोर आली होती.

लक्ष्मण सोळुंके

जालना : जाफराबाद तालुक्यातील सोनखेडा-भराडखेडा गावात कौटुंबिक वादातून एक जण उच्चदाबाच्या विद्युत टॉवरवर चढल्याची घटना काल समोर आली होती. जाफराबाद तालुक्यातील सोनखेडा-भराडखेडा या गावात मंगेश शेळके नामक युवकाने घरगुती वादातून हे जीवघेणे कृत्य केले होते.

सविस्तर घटना अशी, मंगेश शेळके याची सोनखेडा-भराडखेडा हि सासुरवाडी असून हा युवक बायकोसोबत व सासुरवाडीतील लोकांसोबत झालेल्या वादातून रुसून बसला. त्याने मद्यप्राशन देखील केले होते. घरगुती वादातून या रुसलेल्या जावई बापूंनी राग काढण्यासाठी थेट गावातील हायव्होल्टेज विद्युत पोल गाठला !

काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याने हा सर्व प्रकार केला होता. त्याची बायको, सासुरवाडीतील त्याचे नातेवाईक आणि गावातील ग्रामस्थ त्याला खाली उतरण्यासाठी विनवणी करत होते. मात्र, अशी विनवणी केल्यावर त्याचा जोर अधिक वाढत होता! हा जावई कोणाचेच ऐकत नाही हे गावकऱ्यांना कळून चुकल्यावर त्यांनी थेट पोलीस स्टेशनला सांगावा धाडला आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी या जावई बापूंची रवानगी आता थेट सात दिवसांकरता कारागृहात केलीय. मंगेश शेळके याच्या विरोधात 107 सीआरपीसी प्रमाणे शांतता भंग केल्याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर तालुका दंडाधिकारी यांच्या समोर शेळके याला सादर केले असता, त्यांनी सहा महिन्याच्या अवधी मध्ये शांतता राखण्यासाठी 10 हजार रुपये व एका जामीनदारासहित अंतिम बंधन पत्र लिहून देण्याचे समन्स बजावले होते.

समन्सचे पालन मंगेशला करता आले नसल्याने तालुका दंडाधिकारी जाफराबाद व महसूल सहाय्यक यांच्या आदेशाने कलम 122 नुसार 7 दिवसांकरता मंगेशची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आलीय. मंगेशला टॉवर वर चढण्याचा अन विरुगिरी करण्याचा अभिनव प्रयोग चांगलाच अंगलट आलाय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT