Akola Crime अॅड. जयेश गावंडे
महाराष्ट्र

धक्कादायक! मुलीला सासरी न पाठवल्याचा राग; जावयाने केली सासऱ्याची हत्या

काही क्षणाच्या रागापायी अनेकांचे आयुष्य उद्धस्त झाले

अॅड. जयेश गावंडे

अकोला: काही क्षणाच्या रागापायी अनेकांचे आयुष्य उद्धस्त झाले आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. मुलीला सासरी न पाठवल्याचा राग मनात धरून जावयाने आपल्या सासऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील तेल्हारा पोलीस (Police) स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम पाथर्डी येथे घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी येथील मृतक गजानन पवार यांच्या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. गेल्या ४ महिन्यापासून मुलगी माहेरी पाथर्डी येथे आली होती.

हे देखील पाहा-

२३ एप्रिल दिवशी आरोपी (Accused) जावाई निलेश विठ्ठल धुरंदर रा. उमरी ता तेल्हारा हा आपल्या पत्नीला सासरी पाथर्डी येथे घेऊन जायला आला होता. मात्र, 'वडील घरी नाहीत त्यांना येउ द्या नंतर बघू' असे म्हटले. दरम्यान काही वेळाने मुलीचे वडील हे घरी आले. सासरा आणि जावई या दोघांमध्ये मुलीला सासरी पाठवण्याच्या कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात जावई तेथून निघून गेला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अंगणामध्ये सासरे गजानन पवार हे घराच्या अंगणामध्ये खाटेवर झोपलेले असतांना आरोपी जावई तेथे आला. झोपलेल्या सासऱ्यावर झोपेतच मानेवर धारदार चाकुने वार करून रक्तबंबाळ केले आहे.

यानंतर जखमी गजानन पवार यांनी आरडा-ओरड केली असता मुलगी धावत बाहेर आली. असता तिचा पती हातामध्ये चाकू (Knife) घेऊन उभा होता. यावेळी पुन्हा वार करणार तोच मुलीने आरोपी पतीला ढकलून आरडा- ओरड केली तेव्हा आरोपी तेथून पसार झाला आणि गावभर ही बातमी पसरली मृतक गजानन पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न केले. मात्र, दवाखान्यात घेऊन जाण्याअगोदर मृत झाले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून जवळपास २ तासात शोध घेत आरोपीला अटक करण्यात आले आहे. आरोपीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी कलम ३०२,५०६ नुसार गुन्हा दाखल केले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार ज्ञानोबा फड, पोलीस उपनिरीक्षक रमेश धामोडे, पो कॉ स्वप्नील सरोदे आदींनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT