solapur crime news saam tv
महाराष्ट्र

Solapur Crime News : आईवर कुर्‍हाडीने वार; मुलानं बापास मारलं ठार

या घटनेची माहिती समजताच पाेलिसांनी सखाेल चाैकशी करुन संशयितांवर गुन्हा दाखल केला.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीत शिवाजी थोरात याने आपल्या पत्नीस घरगुती भांडणाच्या रागातून कुर्‍हाडीने पाठीवर वार केला होता. आईला कुर्‍हाडीने मारुन जखमी केले म्हणून शिवाजी थोरात यांचा मुलाने झाडाला बांधून काठीने जबर मारहाण केली. त्यात शिवाजी यांचा मृत्यू झाला. (Solapur Crime News)

दरम्यान बहिणीला कुर्‍हाडीने मारल्याचा राग मनात धरुन शिवाजी यांचा मेव्हुणा भीमराव जाधवने ही देखील त्यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने दोन्ही हात, पाय, मांडी आणि छातीवर मारहाण केल्याचे पाेलिसांनी सांगितलं.

या गुन्ह्यातील दोन्ही संशयितांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा मंद्रूप पोलीस (police) ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा सखाेल तपास सुरु असल्याची माहिती रविंद्र मांजरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update: येवल्याच्या वाईबोथीमध्ये घातक स्फोटक साठा जप्त, तिघांविरोधात गुन्हा

Using Phone Before Sleep: बेडवर जाण्याआधी फोन वापरणं टाळा, ही वाईट सवय मोडण्यासाठी ९ कारणं माहीत असायलाच हवीत

Lucky Mobile Number : मोबाईल नंबर तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या शेवटच्या Lucky अंकाचा खेळ

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

SCROLL FOR NEXT