Solapur University News Saam TV
महाराष्ट्र

सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल; 20 जूनपासून ऑफलाइन परीक्षा होणार

20 जून ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा 20 जून 2022 पासून ऑफलाइन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार आहे, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली. (Solapur university offline exam latest news)

शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा 20 जून 2022 पासून ऑफलाइन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा विभागाकडून पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या सर्व विषयांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

त्यानुसार शहरात 24 तर ग्रामीण भागात 47 असे एकूण 71 केंद्रांवर या परीक्षा होणार आहेत. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून एकूण 70 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.सम सत्राच्या या परीक्षा आहेत. सुरुवातीला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. 20 जून ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोरोना काळात सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्याने विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय कमी झाली. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून एका तासाला पंधरा मिनिटे अधिकचा वेळ विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी दिला जाणार आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून परीक्षा घेण्यासंदर्भात संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार 20 जून 2022 पासून ऑफलाईन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने या परीक्षा सुरू होतील. मात्र काही जणांकडून परीक्षेसंदर्भात अफवा पसरवण्यात येत आहे, अशा अफवांवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच अधिकृत माहिती विद्यार्थ्यांना कळेल. इतर कोणत्याही माध्यमांवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी करून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तिहेरी हत्याकांड! १६ वर्षांच्या मुलाने भाऊ-वहिनीची केली निर्घृण हत्या, ३ वर्षांच्या पुतण्यालाही सोडलं नाही

kalsubai peak : महाराष्ट्राचे एव्हरेस्ट! कळसूबाई शिखराला 'कळसू' हे नाव कसं पडलं? कारण वाचून थक्क व्हाल

Nashik Vidhan Parishad: एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, बंडखोर गीतेंचा दणदणीत विजय; दराडेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

SCROLL FOR NEXT